१. अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहकैद्यांना साक्षर करण्याचा प्रयत्नांमध्ये हिंदी भाषेच्या प्रचाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्या काळी तुरुंगात पत्रव्यवहार करण्यासाठीची भाषा उर्दू होती. सावरकरांना कारागृहात कैद्यांना अधिकार्यांशी हिंदीमध्ये पत्रव्यवहार करण्यास प्रेरित केले. त्यांच्या या कार्याला अधिकार्यांनी विरोध केला.
२. ‘संपूर्ण देशाला जोडणारी एक भाषा असावी आणि ती देवनागरी लिपीतील हिंदीच असावी’, असे स्वा.सावरकरांचे मत होते.
३. ते हिंदी भाषेतील पुस्तकांचे वितरण आणि विक्री करण्यास इतरांना प्रोत्साहित करत असत. स्वा.सावरकर नेहमी सांगत असत, ‘विशेष प्रसंगाच्या वेळी जर कोणी कोणाला काही भेटवस्तू देऊ इच्छितअसेल, तर त्याने हिंदी भाषेतील पुस्तके द्यावीत.’
४. सर्वांनी आपली प्रादेशिक भाषा शिकतांना तिच्यासह हिंदीही शिकावी, असे स्वा. सावरकर सर्वांना समजावत होते. त्यांनी कधीही मराठी भाषेला हिंदी पेक्षा अधिक महत्त्व दिले नाही.
५. सावरकरांच्या हिंदी भाषेच्या प्रचाराच्या कार्याला आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.स्वामी दयानंद सरस्वती हिंदीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी त्यांचे साहित्य हिंदीमध्येच लिहिले आहे. ‘हिंदी भारताची राष्ट्रभाषा असावी’, असे स्वामीजींचे मत होते.
६. भाषाशुद्धीसाठी प्रयत्न करणे : स्वा. सावरकर म्हणत, ‘इंग्रजी, अरबी अशा भाषांमधील शब्द म्हणजे आपल्या भाषेवर चाबकांनी घातलेले घावच आहेत. हिंदीमधून प्रत्येक परकीय शब्दाला धान्यातील खड्यांप्रमाणे वेचून बाहेर फेकले पाहिजे.
संदर्भ :गीता स्वाध्याय, सप्टेंबर २०१०